आमच्या ग्रामपंचायतीबद्दल
पांगरी गाव माण तालुक्याच्या उत्तरेस दहिवडी-फलटण मुख्य रस्त्यावर सुमारे १० किलोमीटर अंतरावरती आहे. धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा मंदिर प्रसिद्ध असून ते प्राचीन आहे. या ठिकाणी देव दर्शनास राज्यासह इतर राज्यातील भाविक येत असतात धनगरी गजीनृत्य, ओव्या, उंबरा, जेवण यासाठी प्रसिद्ध क्षेत्र आहे. गावची लोकसंख्या २००० चे दरम्यान आहे. भौगोलिक क्षेत्र पठाराची जमीन असून ओढा, तलाव पाण्याचे स्रोत पूर्णता निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या गावात अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हायस्कूल, आश्रम शाळा अशा शैक्षणिक सुविधा आहेत. ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, सोसायटी ऑफिस अशी कार्यालय आहे. गावात एकूण ३ वार्ड असून सदस्य संख्या ९ इतकी असते. सरपंच पद थेट पद्धतीने निवड केली आहे. संगणक परिचालक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक, अशा सेविका, अंगणवाडी सेविका इत्यादी कार्यरत आहेत.
आमचे कार्यक्षेत्र
पाणीपुरवठा आणि स्वच्छता
स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे आणि ड्रेनेज व्यवस्था सुधारणे.
ग्रामीण रस्ते विकास
अंतर्गत गावातील रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल.
पर्यावरणीय प्रकल्प
वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहिमा.
आरोग्य आणि स्वच्छता
वैद्यकीय शिबिरे आणि आरोग्य तपासणीचे आयोजन.
शिक्षण आणि जागरूकता
साक्षरता आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
आमचा संघ
सौ. सावित्रा दडस
सरपंच
श्री. सुनील लोखंडे
उपसरपंच
श्री. सतीश भोसले
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत - पांगरी
तालुका : माण | जिल्हा : सातारा
सरपंच निवडणूक दिनांक : 2022 | कार्यकाळ समाप्त : 2027
| क्र. | नाव | पद | संपर्क क्रमांक |
|---|---|---|---|
| 1 | सौ. सावित्रा अजित दडस | सरपंच | +91-9307085053 |
| 2 | श्री. सुनील प्रल्हाद लोखंडे | उपसरपंच | +91-9130137210 |
| 3 | श्री. दिनकर मुकिंदा दडस | सदस्य | +91-8275757550 |
| 4 | श्री. सुरज दिलीप गायकवाड | सदस्य | +91-9322796595 |
| 5 | श्री. सुनील निवृत्ती दडस | सदस्य | +91-9422050431 |
| 6 | सौ. कल्याणी जोतीराम दडस | सदस्य | +91-9518371550 |
| 7 | सौ. पूनम सागर गायकवाड | सदस्य | +91-9075064603 |
| 8 | सौ. द्रोपदाबाई सुखदेव गायकवाड | सदस्य | +91-9145576673 |
| 9 | सौ. हसीना कमाल मुलाणी | सदस्य | +91-7385841163 |
| 10 | सौ. सुयोगिता रणजीत आवळे –पाटील | सदस्य | +91-9822282805 |
| क्र. | कर्मचारी नाव | पद | संपर्क क्रमांक |
|---|---|---|---|
| 1 | श्री. सतीश सखाराम भोसले | ग्रामपंचायत अधिकारी | +91-9096390999 |
| 2 | श्री. कैलास गजाजन जाधव | ग्रा.पं.शिपाई | +91-9834113387 |
| 3 | श्री. अविनाश उत्तम नागरगोजे | संगणक परिचालक | +91-9595283906 |
| 4 | श्री. राघु मुकूंद लोंढे | ग्रामरोजगार सहाय्यक | +91-7744058145 |
आमचा दृष्टिकोन
एक स्वच्छ, विकसित आणि स्वयंपूर्ण गाव बांधणे जिथे प्रत्येक नागरिक सन्मानाने आणि संधीने जगेल.
आमचे ध्येय
- पाणी, स्वच्छता आणि रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा पुरवणे.
- गावात शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता यांना प्रोत्साहन देणे.
- बचत गट आणि कौशल्य कार्यक्रमांद्वारे महिला आणि तरुणांना सक्षम बनवणे.
- गावाच्या विकासात पारदर्शकता आणि सहभाग सुनिश्चित करणे.
- पर्यावरणाचे रक्षण करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे.
पांगरी 1 ते 17 मुद्दे माहिती
No Information PDF uploaded yet.
